मंगळावर पाऊल टाकण्याचे मानवाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार

लंडन – नासाने सन 2033 पर्यंत मंगळ मोहिम आखली होती. मात्र आता अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी हीच मंगळ मोहिम 2021 पर्यंत प्रत्यक्षात आणण्याचा चंग बांधला आहे. नासाच्या मंगळ मोहिमेपेक्षा तब्बल 12 वर्षांआधीच मानवाचं मंगळावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा आता निर्माण झाली आहे.

नासाच्या शास्त्रज्ञांनी 2033 पर्यंत मंगळावर अंतराळवीर पाठवण्याची संकल्पना आखली आहे. नासानं या लाल ग्रहावर मनुष्य पाठवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली आहे. मात्र लंडनमधल्या इम्पेरिअल कॉलेजच्या शास्त्रज्ञांच्या मिशननुसार, केवळ आठ वर्षांतच मंगळ ग्रहावर पाय रोवण्याची ही मोहीम पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. या मोहिमेत तीन अंतराळवीरांची एक टीम असेल. जी एका छोट्या अवकाशयानातून मंगळाकडे झेपावेल. या टीमचं नेतृत्व करणारे प्रोफेसर टॉम पाईक यांच्या म्हणण्यानुसार मंगळावर मनुष्यानं पाऊल ठेवण्यासाठीची ही मुख्य पायरी आहे. तसंच या मोहीमेतून नवे नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रीन जगाला मिळतील, असंही त्यांनी म्हटलंय.

या मोहीमेसाठी रोबोट्स आणि माणूस हे दोन्ही सामील होतील. या दोघांच्या मिलाफातून मंगळावर उतरणं आणि तेथून परत येणं शक्य होणार आहे. मंगळाच्या उत्तर भागातील सपाट पृष्ठभागावर रॉकेटच्या आधारे रोबोट्सना प्रथम पाठवण्यात येईल. त्याच रॉकेटच्या मदतीनं ते पुन्हा पृथ्वीवर परततील. मात्र तेव्हा त्याला इंधनाची गरज नसेल.

भारतानं देखील मंगळाबाबत अधिक संशोधनासाठी पुढाकार घेतला आहे. इस्त्रोच्या अंतराळ शास्त्रज्ञांची एक टीम मंगळावर जाण्यासाठी एक मोहीम आखत आहे. मंगळावरच्या संशोधनासाठी भारत देखील आघाडीवर आहे. अमेरिका, रशिया, युरोपियन संघ, जपान व चीन यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. या ग्रहावरील जीवसृष्टीची शक्यता पडताळणं, मंगळाची छायाचित्र घेणं, तिथल्या वातावरणाचा अभ्यास करणं हे भारताच्या मंगळ मोहीमेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे आणि ही मोहीम भारतासाठी एक वेगळा अनुभव देणारी ठरणार आहे. आता अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांना मंगळ मोहीमेत किती यश मिळत हे पाहणं महत्वाचं ठरेल. भारताच्या मोहिमेसाठी देखील तो महत्वाचा टप्पा ठरणार

Leave a Comment