ब्रिटनच्या राणीचे बहुतेक शाही दागिने भारतातून ब्रिटिशांनी नेलेले

सध्या इंग्लंडमध्ये पुढील पिढीतील राजा होणार्‍या राजपुत्राच्या स्वागताचा महोत्सव सुरु आहे. त्या निमित्ताने तो राजा झाल्यावर त्याने सम्राट म्हणून कोणते अलंकार घालायचे आहेत त्याचे प्रदर्शन सुरु झाले आहे त्या अलंकारातील बहुतेक दागिने हे भारतातून ब्रिटिशांनी ब्रिटनमध्ये नेलेले आहेत अर्थातच त्यात प्रमुख जो आहे तो कोहिनूर हिरा आहे. ब्रिटिशांच्या भारतातील दीडशे वर्षाच्या राजवटीत व त्यापूर्वीच्या दोनशे वर्षापूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराच्या नावावर झालेल्या लुटीतील सारे दागिने या प्रदर्शनात आहेत. अर्थात यात फक्त भारतातून नेलेले दागिने आहेत त्याच प्रमाणे जगातील पन्नास देशातून आणलेल्या प्रमुख दागिन्यांचा त्यात समावेश आहे. त्या प्रदर्शनात प्रत्येक दागिन्याच्या खाली विद्यमान राणी एलिझाबेथ दुसर्‍या हिने तो दागिना केंव्हा घातला त्याचा उल्लेख आहे.

ब्रिटनमधील वातावरण सध्या नव्या पिढीच्या स्वागताचे आहे. विद्यमान राणीला सध्या पणतू झाला आहे. राणीचा मुलगा, प्रिन्स चार्लस व नातू विल्यम हेही ब्रिटनच्या गादीचे वारसदार आहेत. पण ब्रिटनच्या राजघराण्यातील पद्धतीप्रमाणे राणीएलिझाबेथ दुसरी ही जिवंत असेपर्यंत राजमुगुट व राजवस्त्रे तिच्याकडेच राहणार आहेत. त्यामुळे राजपुत्र चार्लस व त्याचा मुलगा राजपुत्र विल्यम यांना केंव्हा राजगादी मिळणार हे कोणालाही संागता येणार नाही पण विद्यमान राणी या 87 वर्षाच्या असल्याने त्यांचा पणतु याला ती राजगादी, राजमुकुट , राजवस्त्रे आणि राजदागिने निश्चित मिळतील याची खात्री असल्याने त्यामुळे त्यालाच पुढीचा सम्राट मानून तेथील जनतेने प्रेमाने त्याचे नामाभिदान ‘जॉर्ज अलेक्झेंडर लाउज’ असे केले आहे.

जगात अजूनही अनेक ठिकाणी ब्रिटनची राणी हीच राष्ट्रप्रमुख मानली जाते. अ‍ॅास्ट्रेलिया, द.आफ्रिका अशा अनेक देशांचा ध्वजही युनियन जॅकशी नाते सांगणारा आहे. त्या प्रत्येक देशात ब्रिटनमधील लोकांचे मातृत्व व पितृत्व सांगणारी लाख लाख कुटुंबे आहे. ब्रिटन हा देश राजसत्तेला प्राधान्य देणारा असल्याने ब्रिटनशी संबंधित असलेले प्रत्येक कुटुंब या ना प्रकारे राजघराण्याची नाते सांगत असते. त्याचा सध्याचा परिणाम असा की, ब्रिटनमधील दागिन्यासारखे दिसणारे दागिने आपल्या घराण्यात केंव्हा आले आणि आपले वडील ब्रिटनचे अमुकअमुक अधिकारी असताना राणीने खूष होवून आपल्या घराण्याला अमुक अमुक दागिना कसा दिला यावरही चर्चा सुरु झाली आहे.

जगात एका बाजूला या दागिन्यावर चर्चा सुरु असताना आपल्या देशातून ब्रिटनने लुटून काय नेले याचीही चर्चा पुढे येत आहे. ब्रिटनने सोळाव्या शतकात जगावर व्यापाराच्या निमित्ताने आपले वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न सुरु केला. प्रत्येक देशाची परिस्थिती ब्रिटनने धूर्तपणे हाताळली व दोनशे वर्षात सुसूत्र भूमिका घेवून एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यावेळच्या जगातील साठ देश व विद्यमान भूगोलापर्यंत सत्तर देश राणीच्या साम्राज्याचा भाग बनविले. निम्म्या जगावर हे ब्रिटनचे साम्राज्य होते ते काही दिखाव्यासाठी नव्हते तर सरासरी अडीचसे निम्म्या जगाची लूट ब्रिटनच्या दिशेने सुरु होती. ब्रिटनचे त्या साम्राज्यातील सर्व देश आज कॉमन वेल्थ या संघटनेच्या नावाने वारंवार काही कार्यक्रम करत असतात. या सार्‍या देशांचा विचार केला तर त्यांना सुमारे सन 1950 हे मध्यवर्ति वर्ष धरले तर आधी पाच वर्षे व नंतर पाच वर्षे अशा काळात स्वातंत्र्य मिळाले. त्या सार्‍याच देशांची पहिली पन्नास वर्षे स्वत:चे अस्तित्व शोधण्यात गेली. स्वतंत्र होवूनही ते सारे देश पारतंत्र्यात असल्यासारखेच वागत होते. पण त्या सार्‍या देशातील तरुण पिढी स्वतंत्रपणे विचार करू लागली आहे. आपापल्या देशावर ब्रिटनसारख्या शीतकटिबंधातील एका छोट्या बेटाचे तीनशे वर्षे वर्चस्व होते याचे त्यांना आश्चर्य वाटते आहे. याहीपेक्षा प्रत्येक देशात ब्रिटनने व्यापारी कंपनी म्हणून व नंतर ब्रिटनचे साम्राज्य म्हणून जी लूट केली आहे,त्याचा हिशेाब मांडण्यास आरंभ केला आहे.

अर्थातच याला अमेरिकेत आरंभ झाला आहे. तेथे तर सन 1492 मध्ये कोलंबस तेथे पोहोचला तेंव्हापासूनच्या लुटीचा हिशोब मांडण्यास आरंभ केला आहे. भारतातील विद्यापीठे इतकी युरोपीय व अमेरिकी वर्चस्वावर चाललेली असतात की, भारतातून झालेल्या लुटीवर येथे व्यवस्थित अभ्यासच झालेला नाही. प्लासीच्या लढाईतील सारी लूट इंग्रजांनी इंग्लंडने तेथे कापडाच्या गिरण्या सुुरु करण्यासाठी वापरली. दोन वर्षापूर्वीच आयर्लंडच्या पश्चिम किनार्‍यावर भारतातून सत्तर वर्षापूर्वी ब्रिटनमध्ये चांदी, सोने, चहा आणि कच्चे लोखंड घेवून जाणारे एस एस गेरसप्पा नावाचे जहाज ही जे जर्मनांच्या हल्ल्यात बुडाले होते ते सापडले व ते जहाज दोनशे टन चांदी घेवून जात असल्याची माहिती आज जाणकारांनी दिली आहे. ती सारी लूट कर्नाटकातील म्हैसूर राज्यातील होती. आज त्या चांदीची किंमत पाच अब्ज रुपये झाली असती.

वास्तविक गेल्या पाच शतकात सार्‍या युरोपीय देशांनीच जगावर लूट केली आहे आणि अनेक देशांनी या ना त्या प्रमाणे जागतिक न्यायालयात जावून किंवा युनायटेड नेशन्सच्या काही ठरावाच्या आधारे बरीच लूट परत मिळवली आहे. भारताकडून मात्र हा प्रयत्न होताना दिसत नाही. तीन वर्षापूर्वी युनोने एका ठरान्वान्वये स्विस बँकेतील गुप्त ठेवी परत मिळवण्यासाठी त्या त्या देशाच्या संसदेकडे तशा मागणीचा एक ठराव करून मागितला तर भारताने तसा ठराव करून दिलाच नाही. हा काळा पैसा किती असावा यावर जागतिक वर्तपत्रे म्हणतात, त्यानुसार तो सुमारे शंभर लाख कोटीचा आहे. रामदेवबाबा यांच्या म्हणण्यानुसार स्वीस बँकेसारख्या सेंट कीट्स् सारख्या बँकात मिळून ती लूट तीनशे लक्ष कोटीची आहे. सरकारने मात्र हे आकडे अतिशयोक्त आहेत ,अशी स्थिती जर केंद्र सरकारने स्वातंत्र्यानंतर झालेली लुटीची रक्कम परत आणण्याबाबत आहे तर मग त्या आधी ब्रिटनने केलेली लूट व त्यापूर्वी गझनीच्या महंमदापासून मोंगलांच्या काळापर्यंतची लूट परत आणणे किंवा मोजणे हेही सध्या अशक्य आहे. पण अशी लूट मोजण्यासाठी व परत आणण्यासाठी जर जगातील तरुण सरसावला असेल तर आज ना उद्या भारतातील तरुणही सरसावेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. पण तोपर्यंत तरी केंटचया मुलांच्या दागिन्यांचे कौतूक करणे येवढेच आपल्या हातात आहे.

Leave a Comment