‘त्या’ अल्पवयीन आरोपीची सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली – डिंसेबर महिन्यात झालेल्या दिल्लीतील सामूहिक गँगरेप प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या विरोधात बाल न्याय मंडळातील सुनावणी पुढे ढकण्या‍त आली आहे. या अल्पवयीन आरोपीच्या विरोधातील सुनावणी शुक्रवारी न्याय मंडळापुढे होणार होती. मात्र, ही सुनावणी आता ५ ऑगस्ट रोजी होणार आसल्याचे समजते.

हा आरोपी गेल्या महिन्यात म्हणजेच चार जून रोजी सज्ञान झाला आहे. तरीही तो अल्पवयीन असल्याचे मानूनच शिक्षा सुनावली जाणार आहे.या प्रकरणात जर तो दोषी आढळून आला तर त्याला बाल न्याय मंडळाकडून तीन वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला तीन वर्षापर्यांत म्हणजेच वयाच्या २१ व्या वर्षांपर्यंत बालसुधारगृहाच्या वेगळ्या खोलीमध्ये त्याला ठेवले जाणार आहे.

हा अल्पवयीन आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. पाच बहीण-भावंडात हा आरोपी सर्वांत मोठा आहे. त्याने वयाच्या १२ व्या वर्षी घर सोडले होते. त्यानंतर तो काही काळ दिल्लीत खाजगी बसमध्ये काम करीत होता. या बसमध्ये काम करीत असतानाच गेल्यावर्षी डिंसेबरमध्ये झालेल्या सामूहीक बलात्कार प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Leave a Comment