हरारे- झिम्बाब्वे विरूध्दच्या दुस-या वनडे सामन्यात टीम इंडियाने सावध सुरूवात केली आहे. टीम इंडियाला सुरावातीलाच दोन धक्के बसल्याने आता ही पडझड सावरण्याची जबाबदारी मधल्याफळीवर आली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि गेल्या सामन्यातील शतकवीर विराट कोहली झटपट बाद झाले आहेत. शेवटचे बातमी हाती आली तेंव्हा टीम इंडियाने १३ षटकात दोन गडी बाद ५४ धावा केल्याय होत्या. सलामीवीर शिखर धवन १५ तर अंबाती रायडू तीन धावांवर खेळत होते.
या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. टीम इंडियाचे सुरूवात खराब झाली रोहित शर्मा दुस-याच षटकात बाद झाला. शंभरावा सामना खेळणारा रोहित शर्मा सलग दुस-या सामन्यात अपयशी ठरला. ब्रायन व्हिटोरीच्या पहिल्याच चेंडूवर सिंबांदाने त्याचा झेल टिपला. रोहितने अवघी एक धाव काढली. आजच्या सामन्यात रोहितकडून चांगल्या खेळीची अपेक्षा केली जात होती.
त्यानतर फलंदाजीस आलेल्या कर्णधार विराट कोहलीही लवकरच तंबूत परतला. जर्व्हीसला मिडविकेटकडे खेळण्याडच्या प्रयत्नात कोहलीचा उडालेला झेल वॉलरने टिपला. कोहलीने फक्त १४ धावा केल्या. खेळपट्टीवर शिखर धवन १५ तर अंबाती रायडू तीन धावांवर खेळत आहेत. शेवटचे बातमी हाती आली तेंव्हा टीम इंडियाने १३ षटकात दोन गडी बाद ५४ धावा केल्या होत्या. शिखर धवन आणि अंबाती रायडू या जोडीकडून टीम इंडियाच्या अपेक्षा आहेत. मधल्या फळीतील फलंदाजानी चांगली कामगिरी करून त्यांच्या पुढे मोठे आव्हान उभे करण्याची गरज आहे.