इन्सॅट 3 डीफ ची यशस्वी अंतराळ भरारी

कोओरु – भारताने इन्सॅट 3डीचे एका युरोपियन क्षेपणास्त्राच्या सहाय्याने फ्रेंच गयाना येथील कोओरु येथून यशस्वी उड्डाण केले. एरियन स्पेस या युरोपीय संस्थेच्या एरियन पाच या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उपग्रहाचे गुरुवारी मध्यरात्री एक वाजून 23 मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले. इन्सॅट 3 डी मुळे आता भारतीय हवामानाचा अचूक अंदाज बांधता येणार आहे.

सर्वात आधी अल्फासेट या उपग्रहाचे प्रक्षेपण केल्यानंतर पाच मिनिटांनंतर इन्सॅट 3 डीचे प्रक्षेपण करण्यात आले. अल्फासेट हा यूरोपाचा दूरसंचार क्षेत्रातील सर्वाधिक क्षमतेचा उपग्रह असून युरोपियन अवकाश संस्था आणि इन्मासॅट यांनी तो बनवला आहे. इन्सॅट 3 डी चे यशस्वीपणे प्रक्षेपण झाले असून दहा मिनिटांच्या आतच आम्हाला संदेश मिळू लागल्याचे इस्त्रोचे कार्याध्यक्ष के राधाकृष्णन यांनी सांगितले. पुढील सात वर्षांसाठी हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला असून हवामानाचा
अचूक अंदाज बांधता येणं आता शक्य होईल असा विश्वास राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. इन्सॅट 3डीच्या मदतीने तापमान, हवेतील आद्रता आणि ओझोन वायूचे आवरण याचा अंदाज घेणं शक्य होणार आहे.

Leave a Comment