सर्वात वृध्द ब्रिटीश महिलेचे निधन

लंडन – ब्रिटनमधील सर्वात वृध्द समजल्या जाणार्‍या मूळ भारतीय असलेल्या संत कौर बाजवा या महिलेचे ११५ व्या वर्षी निधन झाले. १ जानेवारी १८९८ असा त्यांचा जन्मदिवस होता आणि त्या लंडनमध्ये आपला नातू सुखराय याच्याकडे राहत होत्या. संत कौर बाजवा या अखंड पंजाबच्या सियालकोट जिल्ह्यातील मोंडे के माझिरा या खेड्यात जन्मल्या होत्या हे गाव आता पाकिस्तानात गेलेले आहे. त्या वयाच्या ३६ व्या वर्षी लंडनला गेल्या आणि तिथेच स्थायिक झाल्या.

संत कौर बाजवा यांच्या एका मुलाचे वय ९० वर्षे आहे आणि त्यांचा एक जावईसुध्दा त्याच वयाचा आहे. त्यांचे जावई लंडनला स्थायिक झाले. त्यांचे अजितसिंग राय. १९६६ साली त्यांची मुलगी मरण पावली. त्यामुळे त्यांच्या जावयाने त्यांना लंडनला नेले. त्यांचा मुलगा सुखराय याचे लालनपालन या आजीनेच केले आणि तिथेच त्यांचा शेवट झाला.

पंजामधून लंडनला गेल्या तरी संत कौर बाजवा यांनी आपल्या राहणीमानात आणि पंजाबी जीवनपध्दतीत काही बदल होऊ दिला नव्हता. त्या अतीशय आनंदी वृत्तीच्या होत्या. मरेपर्यंत त्या आपल्या हाताने स्वयंपाक करून खात होत्या आणि ताजे गरम अन्न खाण्याबाबत त्यांचा कटाक्ष होता.

त्यांच्या पश्‍चात मोठे कुटुंब आहे. त्यांना चार अपत्ये, बारा नातवंडे आणि २८ परतवंडे आहेत. त्यांचा अंत्यविधी लंडनच्या साऊथ हॉल गुरुद्वारामध्ये केला जाणार आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ११५ वर्षे आणि १९९ दिवस एवढे होते.

Leave a Comment