मुंबई – आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले दोन बुकी गुरूवारी मुंबई क्राईम ब्रँचसमोर शरण आले. संजय आणि पवन अशी शरण आलेल्या त्या बुकींची नावे आहेत. ते गुरूवारी मुंबई क्राईम ब्रँचसमोर हजर झाले आहेत. क्राईम ब्रँचकडून या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. त्यानंतर त्यांच्या विरूध्द गुन्हे नोंद करून त्यांन अटक करण्याची शक्यता आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी हे दोघेजण गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी हवे होते. प्राथमिक चौकशीनंतर दोघांनाही अटक होऊ शकते. याआधी जयपूर पोलिसांनी आपल्या अंतरीम अहवालात या दोघांनी नावे संदीप छाब्रिया आणि संजय छाब्रिया असल्याचे म्हटले होते.
विंदू दारासिंगने या दोघांना फरार होण्यास मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोघे गेल्या काही दिवसांपासून दुबईला पळाले होते. त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी रेडकॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यामुळे हे दोघेजण गुरूवारी मुंबई क्राईम ब्रँचसमोर शरण आले. त्यामुळे आता आगामी काळात आयपीएल स्पॉट फिक्सिंग चौकशी प्रकरणाला वेग येण्याची शक्यता आहे. यापूर्वी या प्रकरणी अनेक बड़या बुकिजना अटक करण्यात आली आहे.