उत्तर ध्रुवावरचा मिथेन वायू पसरण्याचा धोका

पॅरिस – ग्लोबल वॉर्मिंगमुळे उत्तर ध्रुवावरचा बर्ङ्ग वेगाने वितळून अनेक परिणाम होणार आहेतच पण या अतिप्रचंड हिमखंडावरच्या बर्ङ्गात अडकलेला मिथेन वायू जर बाहेर पडला तर या जगावर त्याचे ङ्गारच गंभीर परिणाम होतील असा इशारा तिघा शास्त्रज्ञांनी दिला आहे. जगाच्या अर्थकारणावर आणि हवामानावर ङ्गार दीर्घकालीन परिणाम होतील असे या संशोधकांनी म्हटले आहे. या बर्ङ्गाळ प्रदेशात अब्जावधी टन हरित गृह वायू अडकलेला आहे. तो ङ्गारच विषारी ठरू शकतो असे या तिघांचे मत आहे.

रशियाच्या ईशान्येला सैबेरियाचा हिमप्रदेश आहे. त्याचे क्षेत्रङ्गळ ७ लाख ७२ हजार चौरस मैल आहे. हा भाग म्हणजे उत्तर ध्रुवाचा मोठा हिस्सा आहे. या प्रदेशातला ५० अब्ज मिथेन वायू बाहेर पडला तर काय होईल याची माहिती या लोकांनी नमुन्यादाखल दिली आहे. या एवढयाच वायूने येत्या १५ ते ३५ वर्षात पृथ्वीचे सरासरी तापमान २ अंश सेल्सीयसने वाढेल. ख्रिस होप, गेल व्हाईटमन या दोघांनी या परिणामांंचे गणित मांडले आहे.

अनेक नद्यांना येणारे पूर आणि पिकांची हानी यांचाच हिशेब मांडला तर तो ७० महापद्म डॉलर्स एवढा होईल असा इशारा त्यांनी दिला आहे. होणारे नुकसान हे प्रामुख्याने गरीब देशात होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा एवढा वायू येत्या २० वर्षात बाहेर पडेल असा त्यांचा अंदाज आहे.

Leave a Comment