स्नोडेनला विमानतळाबाहेर येण्याची परवानगी?

मास्को दि.२५- अमेरिकन इंटेलिजन्स लिकर एडवर्ड स्नोडेन याला रशियाकडून मास्को विमानतळाच्या ट्रांझिट झोनमधून बाहेर पडण्याची परवानगी दिल्याच्या वृत्ताने अमेरिकन सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली असून स्नोडेन याला त्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगण्यासाठी अमेरिकेला परत पाठविले जावे अशी आग्रही मागणी केली आहे. अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी जॉन केरी यांनी या संदर्भात रशियाचे वरीष्ठ सचिव सर्जी लाव्हरोव्ह यांच्याशी फोनवरून संफ साधून वरील मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे.

स्नोडेन याने राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे कागदपत्र लिक करून देशाच्या विश्वासाला तडा घालविला असल्याने त्याला देशात योग्य त्या न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा भोगावी लागले असे व्हाईट हाऊस स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनीही स्पष्ट केले आहे. रशियन वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार स्नोडेनला मास्को विमानतळाच्या ट्रांझिट झोनमधून बाहेर पडण्यासाठी आणि देशातूनही बाहेर पडण्यासाठी आवश्यक ते कागदपत्र दिले गेले असल्याचे प्रसिद्ध केले आहे. मात्र स्नोडेनच्या वकीलांनी त्यास नकार दिला असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment