मोदींनी अर्ज केला तर व्हीसाचा विचार – अमेरिका

वॉशिग्टन दि.२५ – गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन व्हीसासाठी अर्ज केला तर त्यांच्या अर्जाचा विचार केला जाईल आणि अमेरिकन इमिर्गेशन लॉ अॅन्ड पॉलिसीनुसार व्हिसा देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे स्टेट विभागाच्या प्रवक्त्या जेन पास्को यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिग अमेरिका दौरा करून गेल्यानंतर मोदी यांना व्हिसा देण्याबाबत अमेरिका विचार करते आहे म्हणजे राजनाथसिग यांनी मोदींच्या व्हीसासाठी केलेले लॉबिंग यशस्वी झाले आहे काय असा प्रश्न जेन यांना विचारला गेला होता. त्यावर त्या म्हणाल्या व्हिसाचे नियम बदलले गेलेले नाहीत आणि मोदींनी अर्ज केला तर कायदयानुसार त्यांच्या विनंतीचा विचार करून निर्णय घेतला जाईल.

मात्र अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी यांनी व्हीसा साठी अर्ज केला तरी अमेरिकेतील धार्मिक स्वतंत्रतेसाठी असलेल्या समितीचा अहवाल मोदी यांच्या विरोधात असल्याने त्यांना व्हिसा दिला जाणार नाही.

Leave a Comment