पंतप्रधानपदासाठी स्पर्धा नाही-राजनाथसिंह

नवी दिल्ली्- पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये कसलीच स्पर्धा लागलेली नाही. याबाबत अंतिम निर्णय भाजपच्या संसदीय मंडळच्या बैठकीत घेण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राजनाथसिंह अमेरिक दौ-यावर आहेत. त्यठिकाणी राजनाथसिंह यांनी तेथील पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी अजून पंतप्रधान पदचा उमेदवार ठरला नाही असे सांगितल्याने त्या मुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळला आहे.

यावेळी पुढे बोलताना राजनाथसिंह म्हणाले, ‘आगामी काळात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कोणाला जाहीर करायचे, हे ठरविण्यासाठी भाजपमध्ये एक पद्धत आहे. हा निर्णय पूर्णपणे पक्षाचे संसदीय मंडळ घेते. मी जरी संसदीय मंडळाचा अध्यक्ष असलो, तरी हा निर्णय सर्व सदस्य एकमताने घेतात.’

भाजपच्या प्रचार प्रमुख पदचे सूत्रे हाती घेतलेले नरेंद्र मोदी हे सध्या देशातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत. तरीही त्यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय अद्याप भाजपने घेतलेला नाही. त्यांसदर्भात योग्यवेळ येताच पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक मी बोलावेन आणि त्याच बैठकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार आम्ही एकमताने ठरवू, असेही राजनाथसिंह यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता काही काळ तर पूर्णविराम मिळला आहे.

Leave a Comment