टीम इंडियाचा दणदणीत विजय

हरारे: हरारे टीम इंडियाने विराट कोहलीच्या युवा नेतत्वा्खाली झिम्बाब्वे विरूध्दीच्या पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली आहे. हरारे येथील वनडे सामान्याबत विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीमुळे टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात ६ विकेट्स राखून झिम्बाब्वेवर मात केली.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने टीम इंडिया समोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताचा कर्णधार विराट कोहलीने हरारे येथील मैदानावर कॅप्टन्स इनिंग खेळत असताना एकदिवसीय कारकीर्दीतले आपले पंधरावे शतक ठोकले. त्याच्या कामगिरीमुळे टीम इंडियाला या सामन्यीत सहज विजय मिळवता आला.

टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन स्वस्तात बाद झाल्यावर सामन्याची सुत्रे विराटने रायुडूच्या साथीने डाव सावरला. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला सहज विजय मिळवता आला.

Leave a Comment