जॉर्ज अलेक्झांडर लुईस आणि भारतीय ज्योतिषी

लंडन दि.२५ – राजकुमारी केट आणि ब्रिटन राजघराण्याचा युवराज विल्यम्स यांच्या नवजात बालकाचे नामकरण जॉर्ज अलेक्झांडर लुईस असे करण्यात आले आहे. बाळाचे नांव काय असेल यावर ब्रिटनमध्ये प्रचंड प्रमाणात सट्टा खेळला गेला होता आणि त्यात जार्ज नावाला प्राधान्य दिले गेले होते.

राजघराण्यातील युवराजांची नांवे पूर्वजांवरून ठेवली जातात अशी प्रथा आहे. त्यानुसार नवजात बाळाचे खापर पणजोबा किंग जॉर्ज सहावे यांच्यावरून बाळाचे नांवही जॉर्ज ठेवले गेले आहे. अर्थात त्यापुढे लुईस हे प्रिन्स फिलिप्सचे काका असलेले लूईस माऊंटबॅटन हे व अलेक्झांडर हे स्कॉटलंडच्या पहिल्या राजाने नांवही बाळाला दिले गेले आहे. यदाकदाचित हा युवराज राज्यावर आलाच तर तो किंग जॉर्ज सातवा असेल.

दरम्यान ब्रिटनचा युवराज जन्माला आल्यानंतर तेथील वेळेनुसार भारतीय ज्योतिषांनी बाळाची कुंडली मांडली असून त्याला राजकारणात मोठ्या संधी प्राप्त होतील असे भविष्य वर्तविले आहे. ज्योतिषी राजकुमार शर्मा यांच्या होर्या्नुसार युवराज जास्तीत जास्त उशीरा म्हणजे २०४४ सालात राजकारणात करियर करेल, निवडणुक लढवेल आणि कदाचित ब्रिटनचा पंतप्रधानही होईल. लोकांच्या भल्यासाठी तो काम करेल तसेच अन्य देशांशी सबंध वाढवेल. त्यातही अरब देशांबरोबर त्याचे अधिक संबंध असतील.

अन्य ज्योतिषांच्या मतानुसार त्याचा जन्म पौर्णिमेच्या मुहूर्तावर झाला आहे. हा चांगला दिवस आहे आणि बाळाचे भविष्य उज्च्वल आहे. गेल्या २०० वर्षात घडले नाही असे एखादे चांगले कृत्य त्याच्या हातून घडेल. २६ व्या विवाहयोग असेल असेही सांगितले गेले आहे. प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांच्या मते तो समजूतदार राजा होईल आणि २२ वे वर्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment