गेल्या काही दिवसांपासून कैटरिना-रणबीर सोबतच असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. त्या नेहमीप्रमाणे अफवाच असाव्यात म्हणून सर्वांनी त्या प्रकाराकडे काणाडोळा केला होता. मात्र आता काही फोटो प्रसिध्द झाले आहेत. त्यामुळे कैटरिना-रणबीर जोडीने फिरत असल्याचे फोटो पाहून कोणीपण म्हणेल की दोघे आता साथ-साथच आहेत.
कैटरिना-रणबीर साथ साथ
जरी दोघेपण दोस्ती असल्याचे सांगत असले तरी काही जणांनी त्यांना श्रीलंका एयरपोर्टवर एकत्रित पाहिले. दोघेजण त्याठिकाणी बॉम्बे वेल्वेट या सिनेमाच्या शूटिंगसाठी पोहचले असल्याचे समजते. एयरपोर्टजवळील एका कॉफी शॉप मध्ये रणबीर आणि कैटरीना सोबतच गरमागरम कॉफी पिताना दिसले. यापूर्वी पण त्यांना कित्येक वेळी बाहेर हिंडताना पाहिले आहे. त्या दोघांनी मिळून कैटरिनचा वाढदिवस एकत्रित साजरा केला.
काही दिवसांपूर्वीच दोघांनी एकत्रित लुटेरा हा सिनेमा पाहिला होता. तर त्यापूर्वी एक रात्री त्यांनी बांद्रा परिसरात रिक्षाने एकत्रित फिरताना ही जोड काही जणांना दिसली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि कैटरिना यांच्यातील संबध फार जवळचे असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी १५ दिवस स्पेनमधील सुट़टीत मनमुरादपणे आनंद लुटला असल्याची चर्चा पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये सुरू झाली आहे.