करीना करणार आता हटके रोल

आतापर्यंत बॉलीवूडमध्ये सर्वच प्रकारच्या भूमीका साकरलेली अभिनेत्री करीना कपूर आगमी काळात आता हटके रोल करणार आहे. येत्या काळात ती दोन नवीन सिनेमे करीत असून त्यामध्ये ती वेगळया लूकमध्ये दिसणार आहे. या दोन्ही सिनेमात ती वेगळी भूमिका करणार आहे. यापूर्वी ग्लैमरस रोल करणारी करीना आता आगामी काळात साधे कपडे घालणार आहे.

आगामी काळात येत असलेल्या प्रकाश झाच्या ‘सत्याग्रह’ या सिनेमात ती एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्याशिवाय दिग़दर्शक पुनीत मल्होत्राचा आगामी काळात येत असलेल्या ‘गोरी तेरे प्यार में’ या सिनेमात ती सामाजिक कार्यकर्त्याचा रोल करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाची शूटिंग मुंबईमध्ये‍ सुरू आहे.

यापूर्वी अभिनेत्री करीना कपूरने ‘चमेली’ या सिनेमात एका वेश्याची भूमिका साकरली होती. त्यानंतर तिने ‘थ्री ईडियट्स’ या सिनेमात मेडिकल स्टूडेंट, तर ‘हीरोइन’ मध्ये अभिनेत्री आणि ‘रा.वन’ या सिनेमात गृहिणीची भूमिका साकारली आहे. आता ती पहिल्यांदाच या सिनेमातून सामाजिक कार्यकर्ताचा रोल करीत आहे. तिच्याशिवाय या सिनेमात अभिनेता इमरान खान आणि श्रद्धा कपूरदेखील लीड रोल करीत आहेत. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Leave a Comment