होव- अशेस मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने ऑस्ट्रेलिया संघ आधीच अडचणीत सापडला आहे. त्यातच टीम ऑस्ट्रलियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनच्या पाठीला फ्रॅक्चर झाल्याने उर्वरित मालिकेत तो खेळू शकणार नाही. त्याने या दोन कसोटी सामन्यात सात बळी घेवून मदत केली होती. त्यामुळे आता आगामी काळात टीम ऑस्ट्रलियाला विजयासाठी झगडावे लागणार आहे.
यावेळी बोलताना पॅटिन्सन म्हणाला ‘गेल्या काही दिवसांपूर्वी मी दुखापतामुळे काही महिने संघापासून दूर होतो. यावेळच्या दुखापतीचे स्वरूप तितके गंभीर नाही. मात्र अशेसमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मी भरपूर मेहनत घेतली होती. त्याचे दुख मला वाटत आहे. मला जर खेळता आले असते तर अगामी काळात निश्चीचतच चांगली कामगिरी केली असती.’
पाठीला फ्रॅक्चर झाल्याने पॅटिन्सन हा अशेस मालिकेतील उर्वरित तीन कसोटीत खेळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. अशेसमधील पहिल्या दोन कसोटीमध्ये केवळ गोलंदाज नाही तर फलंदाज म्हणूनही पॅटिन्सनने प्रभाव पाडला. १०व्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने फलंदाजीत मोलाचे योगदान दिले. दोन कसोटींतील चार डावांत पॅटिन्सनला केवळ सात विकेट्स घेता आल्या नॉटिंगहॅममधील पहिल्या कसोटीत त्याने यष्टिरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिनसोबत शेवटच्या विकेटसाठी केलेली ६५ धावांची भागीदारी ऑस्ट्रेलियाला विजयासमीप नेणारी ठरली होती. मात्र विजयासाठी १५ धावा हव्या असताना हॅडिन बाद झाला. त्यावेळी पॅटिन्सन २५ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे आगामी काळात टीम ऑस्ट्रलियाला त्याची उणीव भासणार आहे. त्यारच्याय जागी नव्या खेळाडूची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.