४० वर्षांनंतर ‘लव्ह इन बॉम्बे’ होणार प्रदर्शित

: स्व. अभिनेता दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचा बहूप्रतिक्षित ‘लव्ह इन बॉम्बे’ हा चित्रपट तब्बल ४० वर्षांनंतर येत्या २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. मुखर्जी यांनी या चित्रपटाची निर्मिती १९७३ मध्ये केली होती. परंतु नेहमी काही ना काही अडचणींमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलत होते. १९६० च्या ‘लव्ह इन शिमला’ पासून मुखर्जी यांनी या ‘लव्ह इन…’ च्या सिरिजला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या १९६६ चा गोल्डन जूबली ठरलेला ‘लव्ह इन टोकीयो’ हा चित्रपट मुखर्जी यांच्या कारकिर्दीतला विशेष महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. ‘लव्ह इन बॉम्बे’ या चित्रपटात मुखर्जी हे मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यांची अभिनेत्री वहिदा रहेमान ह्या असणार आहेत. या चित्रपटामध्ये अनेक बडे कलाकार एकत्र आले आहेत. यात अशोक कुमार, किशोर कुमार आणि रहेमान या कलाकारांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत. तर या चित्रपटाचे संगीत शंकर-जय किशन यांचे असून मजरुह सुल्तानपुरी यांनी यासाठी गीतलेखन केले आहे.

Leave a Comment