मुंबई – मुंबईच्या सत्र न्यायालयाने बुधवारी अभिनेता सलमान खानवर २००२ च्या हिट अँड रन प्रकरणी आरोप निश्चित केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या कलमांतर्गत सलमानला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ ऑगस्टला होणार आहे: दरम्यारन, या प्रकरणाच्या. सुनवाणीवेळी सलमान खानला न्यायालयाने गैरहजर राहण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, सलमानने सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्याच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले असून खटला दुस-या न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी २८ संप्टेबर २००२ रोजी सलमानने वांद्रेस्थित मार्गावर मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या नागरिकांच्या अंगावर लॅड क्रुझर गाडी घातली होती. याप्रकरणी नागरिकांना जखमी करणे, नकळत हत्येस कारणीभूत ठरणे, भरधाव वेगाने गाडी चालवणे असे आरोप त्याच्यावर पोलिसांनी ठेवले होते.
१९ जूलैला झालेल्या सुनावणीवेळी सलमान खान महान्यायदंडाधिका-यांसमोर हजर झाला होता. न्यायदंडाधिका-यांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित करत सुनावणी २४ जूलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, सलमानने सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्याच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले असून खटला दुस-या न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली आहे.