विवाहित महिलेवर सहाजणांकडून बलात्कार

नाशिक- नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यात २४ वर्षांच्या विवाहित महिलेवर सहा जणांनी बलात्कार केला. या नराधमांकडून गेल्या तीन वर्षांपासून बलात्कांर केला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये तंटा मुक्ती समितीच्या अध्याक्षाचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

पीडित महिलेचा स्वलभाव भोळसर आहे. तिच्या स्वभावाचा फायदा घेत आरोपींनी तीन वर्षापासून तिला धमकावीत वेळोवेळी बलात्कार केला असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी पीडित महिलेच्या पतीला हा प्रकार समजल्यानंतर त्याने पत्नीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्या वेळी तिने गेल्या तीन वर्षांपासून बलात्कार केला जात असल्याचे सांगितले. आरोपींमध्ये दोन महिलांसह स्थानिक तंटा मुक्ती समितीच्या अध्याक्षाचाही समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोदविला असून आतापर्यंत या प्रकरणी दोन महिलांसह सात जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातला आणखी एक आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आसल्याचे समजते.

Leave a Comment