वर्षासहलीच नव ‘ध्यान केंद्र’ इगतपुरी

igatpuri

पावसाळा म्हटल की कामासाठी घरा बाहेर पडायला नकोस वाटतं. पण भटकंती करायची म्हटलं तर पावसाळ्या सारख्या ऋतु नाही. महाबळेश्‍वर, कोकण, लोणावळा, ठोसेघर, तापोळा आपला सिंहगड आदी ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची तोबा गर्दी झालेली असते. मात्र आजही अनेक ठिकाणे पर्यटकांपासून कोसो दुर आहेत. याच व्हर्जिंन ठिकाणांना लोकांपर्यंत पोहचवण्याच काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी सध्या करत आहे. मुंबई – नाशिक हायवेवर पुण्यापासून साडे चार – पाच तासाच्या अंतरावर असलेल्या विपश्यना केंद्रासाठी जगप्रसिद्ध सलेल्या इगतपुरीलाही सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न ’एमटीडीसी’ करत आहे. चिंब भिजवणारा पाऊस.. मंद वारा.. दाट धुकं.. भिजल्यानंतर अंगात भरलेली हुडहुडी.. अस वातावरण असेल तर भटकंतीला कोण नको म्हणेल?.

Igatpuri

पुण्याचा परिसर, लोणावळा,महाबळेश्‍वर, पाचगणी आदी ठिकाणी प्रत्येक पावसाळ्यात भटकंती केल्या नंतर थोडसं दुर असलेलं इगतपुरी हे निसर्गानं मुक्त उधळण केलेलं ठिकाणही सर्वोत्तम पर्याय आहे. ठाणे आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांना लागूनच नाशिक जिल्हा वसला आहे.

Igatpuri1

मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकच्या अलीकडे सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं इगतपुरी हे ठिकाण मुंबई आणि पुणे दोन्हीकडून जवळ आहे. या परिसराचे अद्याप फारसे शहरीकरण झालेलं नाही, परिसरा बाहेरचे पर्यटकही फारसे नसतात. पांघरलेला निसर्ग, पावसाळी धबधबे, तुडुंब भरलेली धरणं, भातशेती हा सगळा नयनरम्य नजारा सहजच अनुभवता येतो. इगतपुरी हा निसर्गसंपन्न तालुका आहे.

Igatpuri2

इगतपुरी शहराला सह्याद्रीच्या डोंगररांगांचा वेढा आहे. त्यात अंजनेरी, अलंग, धोडप अशा गडकोटांचाही समावेश आहे. इगतपुरी परिसरात खूप धबधबे आहेत. त्यात सुमारे 17 किलोमीटर अंतरावर ठाणे जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाही गावात असलेला अशोका वॉटरफॉल, जोराच्या पावसात धरणाला लागूनच असलेल्या डोंगरांमधून शुभ्र धबधबे कोसळताना दिसतात. इगतपुरीपासून सुमारे पाच किलोमीटरवर बाहुली धरण आहे. सध्या हे धरण काठोकाठ भरलं आहे. त्याच्या चारही बाजूला डोंगररांगा आहेत. बाहुली धरणाजवळचे आणि कसारा घाटातले धबधबे, फटकदादर अशी नावं प्रामुख्यानं घेता येतील.

Leave a Comment