सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता

मुंबई – भारत सरकारने सोन्याच्या आयातीवर निर्बंध घालण्याची नवी नीती जाहीर केली आहे. त्यामुळे भारतातले सोन्याचे भाव येत्या दोन महिन्यात वाढून पुन्हा एकदा ३० हजाराच्या वरच्या पातळीला जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारत सरकारने गेल्या आठवड्यात सोन्याची आयात करण्यावर आयात कर वाढवण्याबरोबरच निर्यातीचेही बंधन लादले आहे.

सोने आयात करणार्‍यांना आयातीतला केवळ ८० टक्के एवढाच हिस्सा देशांतर्गत वापरासाठी आणि विक्रीसाठी वापरता येईल. २० टक्के सोन्याचे दागिने तयार करून ते निर्यात करावेच लागतील, असे बंधन सरकारने घातले आहे. काही सराङ्गांचा त्याला विरोध आहे, परंतु सरकारला ते आवश्यक वाटते. कारण त्यामुळे सोन्याची आयात कमी होऊन निर्यातीच्या रुपाने डॉलर्सची कमाई होणार आहे.

काही सराङ्ग व्यापार्‍यांनी मात्र या निर्बंधाचे स्वागत केले आहे. निर्यातीची सक्ती असल्यामुळे निर्यात वाढेल आणि आपले निर्यातीपासूनचे उत्पन्न वाढून डॉलरची कमाई होईल आणि रुपयाचे मूल्य वाढण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment