फ्रान्समध्ये पुन्हा बुरख्याचा वाद

पॅरिस – फ्रान्समध्ये मुस्लीम महिलांना पूर्ण शरीर झाकणारा बुरखा पांघरून फिरण्यास दोन वर्षांपासून बंदी करण्यात आलेली आहे. पण तरी सुद्धा काही महिला त्याचा आग्रह धरतात आणि त्यातून तिथे संघर्ष उभा राहतो. गेल्या आठवड्यात या मुद्यावरून पॅरिस शहराच्या ट्रेप्स् या उपनगरामध्ये दगडफेकीच्या आणि हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. आता पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली असली तरी या उपनगरात राहणार्‍या मुस्लीम समाजात बुरख्याच्या बंदीच्या विरोधात तीव्र असंतोष घुमसत आहे.

यूरोपातल्या सर्व देशांमध्ये मुस्लीम वस्ती आहे. परंतु ङ्ग्रान्स हा सर्वाधिक मुस्लीम वस्तीचा देश आहे. २०११ च्या एप्रिलमध्ये ङ्ग्रान्सच्या सरकारने बुरखा परिधान करण्यास बंदी घातली. या देशातले मुस्लीम प्रामुख्याने उत्तर आङ्ग्रिकेतल्या देशातून आलेले आहेत आणि ते बुरख्याच्या बाबतीत आग्रही आहेत. मात्र बुरखा परिधान करून वावरणार्‍या महिलेला जागीच २०० डॉलर दंड केला जातो.

अशाच एका महिलेला पकडून तिला दंड ठोठावला जात असताना तिच्या पतीने हस्तक्षेप केला. त्यामुळे त्याच्यात आणि पोलिसात धक्काबुक्कीे झाली. लोक चिडले. २५० मुस्लीम युवक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांवर दगडङ्गेक केली. २० वाहने जाळली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. आपल्याला बुरख्याचा नियम मान्य आहे, परंतु पोलीस या नियमांची अंमलबजावणी करताना मुस्लीम स्त्रियांशी गैरवर्तन करतात, अशी तिथल्या मुस्लिमांची तक्रार आहे.

Leave a Comment