पूजा पवारचे पुनरागमन

मस्ती एन्टरटेंन्मेंट निर्मित हेडलाईन’ चित्रपटातून पूजा पवार ही तब्बल 17 वर्षांनी मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. एका काळची यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेल्या पूजाने लग्नानंतर चित्रपटसृष्टीला रामराम केला होता. 1987 साली रमेश देव निर्मित अन् राजदत्त दिग्दर्शित सर्जा’ चित्रपटातून पूजाने पदार्पण केले होते. एक होता विदुषक, सर्जा, माझा छकुला, झपाटलेला , चिकट नवरा अशा चित्रपटातून तिने कारकिर्दीची घोड्दोड सुरु ठेवली होती. हेडलाईन’ मध्ये ती मध्यवर्ती भूमिकेत आहे. तिच्या बरोबर या चित्रपटातून निखिल वैरागर व अजिंक्य जाधव हे दोन नवीन चेहरे मराठीत पदार्पण करत असून प्रसाद ओक, सिया पाटील, वंदना वाकनीस, दिपक करंदीकर, शाश्वती पिंपळीकर दिसणार आहे. माझी भूमिका खूप चांगली असून वेगळ्या धाटणीच्या विषयावर हा चित्रपट आहे. प्रेक्षकांना तो नक्की आवडेल असा विश्‍वास पुजा व्यक्त करते.

Leave a Comment