ओएनजीसीने दत्तक घेतला ताजमहाल

आग्रा दि.२४ – क्लीन इंडिया कॅम्पॅन मोहिमेत देशातील बडी तेल कंपनी ओएनजीसी ने युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या आग्रा येथील ताजमहाल ची अंर्तबाह्य स्वच्छता ठेवण्यासाठी ताजमहाल अॅडॉप्ट केला असल्याचे समजते. ताजमहालाबरोबरच महाराष्ट्रातील वेरूळ व एलिफंटा केव्हज, तसेच दिल्लीचा लाल किल्ला, हैद्राबाद जवळचा गोवळकोंडा किल्ला व तमीळ नाडूतील महाबलीपुरम ही स्थळेही दत्तक घेतली आहेत.

केंद्रीय पर्यटन विभागाने देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या क्लिन इंडिया कॅम्पॅनचा शुभारंभ आज आग्रा येथे होत असून त्यासाठी पर्यटनमंत्री के. चिरंजीवी आग्रयात दाखल झाले आहेत. या मोहिमेअंतर्गत देशातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची स्वच्छता राखण्यावर अधिक भर दिला गेला असून त्यासाठी खासगी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना सामील करून घेतले जात आहे.

ताजमहाल ची जबाबदारी आत्तापर्यंत पुराणवस्तू विभागाकडे होती. ती आता ओएनजीसीकडे जाणार आहे. १७ व्या शतकात बांधला गेलेला हा महाल आजही जगभरातील पर्यटकांचे आवडते आणि मुख्य आकर्षण आहे. पर्यटनस्थळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी तेथे स्वच्छता ठेवण्यावर व पर्यटकांसाठी सोयी सुविधा देण्यावर पर्यटन मंत्रालयाने भर दिला असून १२ व्या पंचवार्षित योजनेत याचा समावेश केला गेला होता असे समजते.

Leave a Comment