हरियाणा – बिहार, तमिळनाडू, गोवा तसेच महाराष्ट्रानंतर आता हरियाणातही आता माध्यान्ह भोजनात चक्क पाल सापडली आहे. बिहार येथे शाळेत दिल्या जाणार्या मध्यान भोजनातून विष बाधा होऊन 20 हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच; हरियाणात पलवल येथील एका सरकारी शाळेत मध्यान्न भोजनात पाल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हरियाणात सरकारी शाळेतील मध्यान्न भोजनात सापडली पाल
वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. विद्यार्थ्यांनी हे अन्न खाल्ले असते तर पुन्हा एकदा बिहारची पुनरावृत्ती झाली असती. पलवल येथील लोहागढ़ गावातील शाळेत हा प्रकार घडला आहे. येथील सरकारी शाळेतील 500 मुलांना रोज मध्यान्न भोजन दिले जाते. सोमवारी दुपारी नेहमी प्रमाणे मुले जेवणासाठी जमली असता शाळेतील एका शिक्षकाला अन्नात पाल आढळली. सुदैवाने एकाही मुलाने हे अन्न खाल्ले नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
मध्यान्न भोजनात दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असते. या जेवनात किडे आढळल्याच्या तक्रारी यापूर्वी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच शासकीय अधिकार्यांनी शाळेला भेट देऊन अन्न पुरवठा करणार्या संस्थेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
