‘दुनियादारी’ची ‘भाग मिल्खा भाग’वर मात

पुणे, दि. 23 – मराठी चित्रपट पहायला प्रेक्षक चित्रपटागृहापर्यंत येतच नाहीत हे चित्र नेहमी बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच भरत जाधवच्या एका चित्रपटाचे शो प्रेक्षक नसल्याच्या कारणास्तव रद्द करण्याचा आले होते. हा प्रसंग ताजा असतानाच संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ने मात्र मराठीला प्रेक्षक नाही हा समज दूर करत बॉक्स ऑफिसवर मरहान अख्तरच्या ‘भाग मिल्खा भाग’वर मात करत वाटचाल सुरू केली आहे.

मागील शुक्रवारी हिंदीमध्ये बहुचर्चीत ‘डी – डेम , प्रभुदेवा दिग्दर्शित ‘रमय्या – वतावय्या’ हे दोन चित्रपट तर मराठीत ‘दुनियादारी’ आणि ‘रणभूमी’ प्रदर्शित झाले. या आगोदरच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘भाग मिल्खा भाग’ तिकिटबारीवर सुपरफाास्ट धावत असल्याने 19 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चारही चित्रपटात शो मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा लागली होती. नेहमी प्रमाणे मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्ससह सिंगल स्क्रिनमध्येही प्राईम टाईम मिळाला नाही. तरीही सुहास शिरवाळकर यांच्या ‘दुनियादारी’ कादंबरीवर आधारीत संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ चित्रपटात असलेली यंगस्टार टिम यामुळे चित्रपटाने गर्दी खेचायला सूरूवात केली. पहिल्या तीन दिवसात मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून चित्रपटगृह चालकांनी ‘दुनियादारीचे शो वाढविले, प्राईम टाईम दिला आणि मल्टीप्लेक्समध्ये सर्वात मोठ्या स्क्रिनवर आता ‘दुनियादारी’चे राज्य सूरू झाले आहे.

या संदर्भात ‘आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सिटी प्राईड, कोथरूडचे व्यवस्थापक सुगत थोरात म्हणाले, सिटी प्राईड ग्रुपने मराठी चित्रपटांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. ‘दुनियादारी ’मध्ये स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर अशी युवा टीम असल्याने या चित्रपटाला चांगले शो मिळाले होते. पहिल्या तीन दिवस सर्व शो हाऊसमुल झाल्याने सोमवार पासूनही चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अपेक्षेपेक्षा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने दुनियादारीचे शो आमच्या चारही मल्टीप्ले्नस मध्ये वाढविण्यात आले आहेत, प्रत्येक ठिकाणी दिवसाला पाच ते सहा शो सुरू आहेत तसेच मोठ्या स्क्रिनला भाग मिल्खाचे शो सुरू होते त्या ठिकाणी आता दुनियादारीचे शो करण्यात येत आहेत. येत्या गुरूवार पर्यंतच्या अ‍ॅडव्हान्स बुकींगलाही चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे थोरात यांनी सांगितले.

Leave a Comment