अपत्य जन्माचे दोन सोहळे

लंडन – ब्रिटनच्या राजघराण्यातील युवराज विल्यम्स् आणि त्याची पत्नी केथ मिड्लटन यांना मुलगा झाला आहे. सारे जग केथच्या अपत्याकडे डोळे लावून बसले होते. केथला मुलगा होणार की मुलगी, यावर पैजा लागल्या होत्या. शेवटी तिला मुलगा झाला आणि सारी उत्सुकता संपली.

सार्‍या जगाचे लक्ष वेधून घेणारी ही प्रसूती एका बाजूला होत असतानाच उत्तर इराणमध्ये एक विक्रमी बालिका जन्म घेत होती. विक्रमी अशा करिता की, तिच्या वडिलांचे वय १०८ वर्षांचे आहे. शंभरी पार केलेल्या या पित्याला दोन बायका आहेत. त्यातल्या पहिल्या पत्नीने नऊ अपत्यांना जन्म दिलेला आहे. तर दुसरीने आता दुसरे अपत्य जन्माला घातले आहे. काल तिला एक मुलगी झाली.

या शतकोत्तरी पिता झालेल्या आणि अकरा मुलांना जन्म दिलेल्या पित्याचा पहिला मुलगा ८० वर्षांचा आहे. यथानुक्रमे अन्य मुलेही वृद्ध झाली आहेत आणि त्यांनाही भरपूर मुले झाली असल्यामुळे काल पिता झालेला हा वृद्ध गृहस्थ अनेक नातवांचा आजोबा, पतवंडांचा पणजोबा आणि खापर पतवंडांचा खापर पणजोबा आहे. त्याच्या नातवंडा-पतवंडांची एकूण संख्या शंभरावर आहे.

या मुलीच्या जन्माची कोणी दखल घेतली नसती, पण शंभरी पार केलेल्या पित्याची मुलगी म्हणून तिला महत्व आले. केथ मिड्लटन हिच्या मुलाला मात्र राज घराण्याचा वारस म्हणून महत्व आले आहे. युवराज चार्ल्स आणि युवराज हॅरी यांच्या नंतर इंग्लंडच्या राज घराण्याला लाभलेला हा तिसरा वारसदार आहे. तशी घोषणा सेंट जेम्स पॅलेसमधून करण्यात आलेली आहे. जगभरातल्या अनेक राष्ट्र प्रमुखांनी ब्रिटनच्या राजघराण्याचे पुत्र जन्माबद्दल अभिनंदन केले आहे.

राजघराण्याच्या या नव्या वारसाचे बारसे दहा दिवसानंतर थाटात केले जाणार आहे. इराणमधल्या त्या विक्रमी मुलीच्या जन्माचे कौतुक झाले खरे, पण आता राजघराण्याच्या वारसाप्रमाणे तिचे बारसे हा काही बातमीचा विषय होणार नाही.

Leave a Comment