गाझियाबाद- १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. या घटनेतील आरोपी दिल्ली पोलिस दलातील एका कॉन्स्टेबलचा मुलगा आहे. गाझियाबादमधील विजयनगर भागात हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले बलात्काराचे हे सत्र थांबण्यास तयार नाही.
सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार
गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीचे कुटुंबीय हे दिल्ली पोलिस दलातील या कॉन्स्टेबलच्या घरामध्ये भाड्याने राहतात. सोमवारी रात्री पीडित मुलीच्या अंगावर काही ठिकाणी जखमा आणि रक्त दिसल्यानंतर हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात आला. त्यानंतर या मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. ही मुलगी सध्या इयत्ता पहिलीत इयत्तेत शिकत आहे. घरामध्ये ती एकटी असताना संबंधित मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या पीडित मुलीचे वडील नोएडामध्ये नोकरी करतात. याप्रकरणी विजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडित मुलीला वैद्यकीय तपासणी करण्यास पाठवले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.