पंजाबी असलो तरी मनाने मराठीच – अक्षय कुमार

पुणे, दि. 22 – दमदार अभिनय, रोमान्स आणि कॉमेडीमुळे लाखो तरुणींच्या दिलची धडकन असलेल्या ‘रावडी राठोड’ अक्षय कुमारने काळया रंगाच्या मर्सिडीजमधून एका सुपरस्टारला शोभेल अशी एंट्री मारली आणि तरुणाईने एकच जल्लोष केला. उपस्थितांशी मराठीत संवाद साधत खिलाडी अक्षयने तरुणाईला कही क्षणात जिंकले.

आमदार अनिल भोसले मित्र परिवारातर्फे संभाजी बागेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात अक्षय कुमारची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अनिल भोसले, नगरसेविका रेश्मा भोसले, बाळासाहेब बोडके उपस्थित होते. 108 वेळा रक्तदान करणारे रक्तदाते नाते ट्रस्टचे राम बांगड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

‘नमस्कार, कसे आहात आपण…’ असे अस्सल मराठमोळ्या ढंगात अक्षयने सुरुवात केली आणि तरुणांनीही टाळया आणि शिट्यांनी त्याला प्रतिसाद दिला. कोणत्याही ज्योतिषाला विचारुन मी माझे नाव बदलले नाही असे सांगतानाच अक्षय म्हणाला, 1990 मध्ये माझ्या पहिल्या सौंगंध या चित्रपटाचे प्रथम पुण्यात शुटिंग झाले, त्यामुळे पुण्याशी माझे घट्ट नाते आहेत. कॅनडा येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे. माझ्या यशााचे रहस्य माझ्या आई-वडीलांचे आशिर्वाद आहेत. मी जरी पंजाबी असलो तरी मला मराठी चांगलं बोलता येते, याचा मला आनंद आहे. लवकरच मी निर्मिती केलेला मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे, माझे मराठी चित्रपटसृष्टीतील पहिले पाऊल असून त्यालाही तुम्ही पाठींबा द्या, असे आवाहन अक्षयने केले.

मार्शल आर्ट शाळेत अनिवार्य करावे
मार्शल आर्टमुळे मी स्टंट सहज करु शकतो. स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट गरजेचे असून, प्रत्येक घरात एक मार्शल आर्ट शिकलेला व्यक्ती असल्यास आपोआप देश बलवान होईल त्यामुळे शाळसांमध्ये इतर विषयांबरोबर मार्शल आर्ट अनिवायर्स करावे अशी मागणी अक्षयने यावेळी केली.

Leave a Comment