केरळात आयुर्वेदिक पर्यटनाला चालना

पलक्कड – भारतात वैद्यकीय पर्यटनाचा मोठा बोलबाला होत आहे पण या पर्यटनात अलोपाथीचे उपचार आणि शस्त्रक्रिया यांचा प्रामुख्याने समावेश असतो. पण आता केरळात अनेक ठिकाणी केवळ आयुर्वेदिक उपचार करणारी तसेच योगोपचार करणारी खास रिसॉर्ट निर्माण झाली आहेत. या आयुर्वेदिक आणि योगिक पर्यटनाला तिथे चांगलीच गती मिळाली आहे. विशेषत: पलक्कडच्या परिसरात असे ५० ते १०० एकरावर पसरलेले खास रिसॉर्ट मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आले आहेत.

palakkad-resorts

(फोटो सौजन्य – blessingsonthenet.com)

या रिसॉर्टमध्ये पिरॅमिडच्या आकाराची कुटिरे उभारण्यात आली आहेत. ती वातानुकूलित असून तिथे राहण्यासाठी दिवसाला ९ हजार ते २० हजार रुपयापर्यंत भाडे आकारले जाते. शहरातल्या घाईगर्दीच्या आयुष्याला कंटाळलेल्या लोकांना मन:शांतीसाठी हे ठिकाण योग्य आहे. कारण येथे प्रचंड हिरवळ तर असतेच पण अनेक झाडे लावलेली असतात. नदीच्या प्रवाहाचा भास व्हावा असे पाण्याचे प्रवाह असतात आणि धबधबेही असतात.

palakkad-resorts2

अशा निसर्गाच्या सान्निध्यात केवळ एखादा दिवस मुक्काम केला तरी माणसाला ताजे तवाने झाल्याचा अनुभव येतो. तिथली झाडेही वेचून लावलेली आहेत. ती आयुर्वेदिक औषधांची झाडे आहेत. याच परिसरात एक योग कुटीर असते. त्यात अनेक प्रकारची आसने आणि ध्यान धारणा शिकवली जाते. या रिसॉर्टस्चे दुसरे महत्त्व म्हणजे मसाज. रुग्णाला त्याच्या विकाराच्या अनुसार मसाज केला जातो.

palakkad-resorts1

काही पुस्तक प्रेमी तर येथे केवळ मनसोक्त वाचन करण्याची भूक भागवण्यासाठीच येत असतात. त्यांना तिथल्या हजारो पुस्तकातून आपल्या आवडीची पुस्तके निवडून वाचता येतात. या पर्यटनाला जर्मनीतल्या तसेच आखाती देशातल्या पर्यटकांची मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांना या ठिकाणी २२ प्रकारच्या विकारांवर उपचार मिळतात. ऑस्ट्रेलियातले अनेक रुग्ण केवळ आयुर्वेदिक उपचारासाठी तिथे येतात.

Leave a Comment