तसे पाहिले तर बॉलीवुडमध्ये अभिनेत्री असिनने आतापर्यंत सहा सिनेमातच काम केले आहे. मात्र तिचे हे सर्वच सिनेमे हिट झाले आहेत. तिच्या काही सिनेमाने तर १०० कोटीचा आकडा पार केला आहे. त्यामुळे असिनने सिनेइंडस्ट्रीत तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे पाच ब्लॉक बस्टर्स सिनेमे आजपण सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. त्या मुळेच तिने आगामी काळात आवडेल असाच रोल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आवडत असलेला रोल करते- असिन
अक्षय कुमार, आमिर खान, सलमान खान, अजय देवगन आणि जॉन अब्राहम सोबत काम करणा-या अभिनेत्री असिनच्या यशाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे असिन सुध्दा तिच्या यशामुळे सध्या एंजॉय करीत आहे.
याबाबत बोलताना अभिनेत्री असिन म्हणाली, ‘मी एक यशस्वी अभिनेत्री ठरले याचा मला आनंद आहे. मी आतापर्यंत केलेले सर्व रोल्स एंजॉय केले आहेत. आगामी काळातपण काम करताना मी आवडेल अशाच सिनेमात काम करण्याचे ठरविले आहे. सिनेमात मला वयाने मोठया असलेल्या हिरोसोबत काम करताना अडचण येत नाही. उलट त्यांच्याकडून बरेच काही नवीन शिकण्यास मिळते याचा मला आनंद वाटतो. त्याचा अर्थ मला यंग हिरोसोबत काम करायला आवडतो असा होत नाही. रोल चांगला असेल तर माझी काम करण्याची तयारी असते. त्यामुळे कोणासोबत काम करायचे आहे त्यापेक्षा मी आवडलेले काम करण्यास प्राधान्य देते.’