अजूनही मालिक जिंकण्याचा क्लार्कचा विश्वास

लंडनः अशेस मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात वाईट पध्दतीने पराभव सहन करावा लागल्याने कांगारूची स्थिती अवघड झाली आहे. गेल्या काही दिवसात सलग सहा कसोटी सामन्यात टीम ऑस्ट्रेलियाला पराभव सहन करावा लागला होता. अशेस मालिकेत २-० सुरूवातचे दोन सामने जिंकून इंगलंडने आघाडी घेतली आहे. अजूनही अशेस मलिका जिंकण्याचा क्लार्कचा विश्वास आहे.

वर्षाच्या सुरूवातीलच टीम इंडियाकडून ४ -0 असा सपाटून मार खाणा-या ऑस्ट्रेलियाची ससेहोलपट सुरूच आहे. लॉर्डसच्या दुस-या कसोटीत यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ३४७ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यासने मालका पराभवाचे संकट ओढावले आहे. १९८४ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियन संघावर अशी आपत्ती ओढवलीय पण ऑस्ट्रेलियन कर्णधार क्लार्क अजूनही बाजू पलटवण्याची उमेद बाळगून आहे.

संघातील प्रमुख फलंदाजांचे अपयश हे नाकारता येत नाही अन पहिल्या डावात सव्वाशे धावात गारद झाल्यावर कसोटी सामना जिंकणे कठीण आहे असे क्लार्क म्हणाला. दोन कसोटीत एकाही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला शतक झळकावता आलेले नाही. ठिसूळ फलंदाजी हे ऑस्ट्रेलियन संघाचे मोठे अपयश आहे. पहिल्या डावात १२८ तर दुस-या डावात २३५ धावा ऑस्ट्रलियन फलंदाजांनी केल्या. उस्मान खाँजा तसेच कर्णधार मायकेल क्लार्क यांनी अर्धशतके फटकावली. अव्वल सहा फलंदाजांचे अपयश तसेच सलामीवीर शेन वॉटसनचे चारपैकी तीन डावात पायचीत होणे हे खटकणारे आहे.

इंग्लंडने अशेस मालिकेत ५ – ० असे यश कधीही संपादन केलेले नाही पण दोनदा त्यांना ५ – ० अशा दारूण, मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. १९२० – २१ तसेच २००६ – ०७ मध्ये त्यांना ही नामुष्की सहन करावी लागली होती. व्हाईटवॉशची बात आता करणे उचित नाही असे कूक म्हणाला.

Leave a Comment