राहुल गांधी यांचे काँग्रेसजनाना भेद मिटवायचे आवाहन

नवी दिल्ली – काँग्रेसजनानी आपआपसातील मतभेद मिटवावेत आणि एकत्र यावे असे आवाहन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केले आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या माध्यामतून नवी दिल्ली येथे दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या हस्ते या
अधिवेशनाचे उद्घाटन झाले.

काँग्रेसचे देशभरातील देशभरातील 250 प्रवक्ते यावेळी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वधभूमीवर राहुल गांधी यांनी या अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातील प्रवक्त्यांना मार्गदर्शन केले.

देशभरात राज्यांमधील माध्यमनीती आणि प्रचार करण्यासंदर्भात रणनीती आखण्याच्या दृष्टीने तसेच कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी हे अधिवेशन बोलविण्यात आले आहे. गांधी यांच्याबरोबरच, केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, आनंद शर्मा, जयराम रमेश, शशी थरूर आणि मनीष तिवारी हेदेखील या अधिवेशनास संबोधित करणार आहेत.

पक्षामध्ये वृद्ध व तरुणांनी एकत्र काम करावे, तरुणांनी ज्येष्ठांच्या अनुभवांवरून बोध घ्यावा असे गांधी यांनी सांगितले. फूड सेक्युरिटी बिल आणि एफडीआय निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. मिडियासमोर बोलताना वादग्रस्त विधान करत पक्षाला स्पष्टीकरण देण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्या अशी टिपणी करत राहूल गांधींनी प्रवक्त्यांचे कान टोचले.

सोशल मिडीयाचा वापर कसा करावा याबाबतही त्यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. मतभेद आणि मनभेद दूर करून काम केल तरच काँग्रेस पक्षाला चांगल यश मिळेल असे सांगत गांधी यांनी काँग्रेस प्रवक्त्यांाना सकारात्मक बोलण्याच्या सल्ला दिला. काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने काँग्रेस पक्षाच्या प्रगतीसाठी काम केले तर, त्यांच्या व्ययक्तिक प्रतिमा उंचावण्यालाही चालना मिळेल असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.