ब्रिटन – ब्रिटनमधील सुनेत्रा गुप्ता या भारतीय वंशाच्या महिलेला जगातील महान महिला शास्त्रज्ञांच्या पंक्तीत बसवनारा सन्मान मिळणार आहे. कोलकाता येथे जन्म झालेल्या गुप्ता ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्या प्राणीशास्त्र विभागात संसर्गजन्य आजार पसरवणा-या जीवांविषयीचे अध्यापन करत आहेत.
विज्ञान क्षेत्रातील महिला या नावाने रॉयल सोसायटीत आयोजित होणार्या चित्रप्रदर्शनात महत्त्वाची कामगिरी करणार्या महिला शास्त्रज्ञांची पोर्ट्रेट लावली जातात त्यात त्यान्चे लावले जानार आहे. विविध प्रकारच्या रोगकारक जीवजंतूंची उत्पत्ती याविषयी गुप्ता यांचा दांडगा अभ्यास आहे. मलेरिया, एन्फ्लूएंझा व जीवाणूजन्य मस्तिष्कदाह या विकारांना कारणीभूत असलेल्या जंतूंविषयी त्या संशोधन करत आहेत.
एक सिद्धहस्त लेखिका म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. त्यामुळेच त्यांच्या विज्ञान व साहित्य या क्षेत्रातील कामाची दखल घेऊन रॉयल सोसायटीने त्यांची निवड या चित्रप्रदर्शनासाठी केली आहे. विज्ञान क्षेत्रातील महिलांची ओळख निर्माण होण्यासाठी तसेच अधिकाधिक महिलांना प्रेरणा व्हावी अपेक्षा यामागे आहे.