करीना-सोनम झळकणार एकत्र

दोन अभिनेत्री एकत्रित काम करणार म्हटले की रूसवे-फुगवे आले. मात्र या सर्व विषयाला फाटा देफन बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री सोनम कपूर आणि करिना कपूर या एकत्र काम करण्याची शक्यता आहे. आगामी काळात या दोघी जणी सिनेमासाठी नव्हे तर एका जाहिरातीच्या माध्यमातून एकत्र झळकणार आहेत.

याबाबत करिना आणि सोनम यांच्याशी संपर्क साधला असता त्या दोघींनीपण एकत्रित काम करणार असल्याचे सांगून टाकले आहे. करिना आणि सोनम या दोन्ही कपूर खानदानातील मुलींची एकमेंकीशी चांगली मैत्री असून त्या अनेकवेळा पार्टीमध्ये एकत्र दिसल्या आहेत. त्यामुळे सर्व हेवेदावे विसरून त्यानी एकत्रित काम करण्याची तयारी दर्शवली आहे. एवढेच नव्हे तर आगमी काळात एखाद़या सिनेमात एकत्र काम करण्याची संधी मिळाली तर करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

डिजायनर मनिष मल्होत्रा आणि सोनम कपूर हे एका टूथपेस्ट कंपनीचे ब्रॅण्ड एम्बेसेडर आहेत. यात आता करिना कपूरचाही समावेश होणार आहे. याच कंपनीच्या टूथपेस्ट जाहिरातीसाठी सोनम आणि करिना एकत्र काम करणार आहेत. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. लवकरच ही याबाबतची अधिकत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment