आंध्रात चीनची १६० अब्ज डॉलर्स गुंतवणूक

हैद्राबाद दि.२२ – आंध्रातील विविध क्षेत्रात चीनने १६० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची तयारी दर्शविली असून भारत अणि चीन या दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध सुरळीत रहावेत यासाठी ही गुंतवणक केली जात असल्याचे चीनचे अध्यक्ष झी जिंगपिग यांचे आर्थिक सल्लागार शुसन मा यांनी स्पष्ट केले आहे. मा यांनी नुकतीच आंध्राचे मुख्यमंत्री एन. कुमार रेड्डी यांची भेट घेऊन या विषयीची चर्चा केली असल्याचे समजते.

चीनने प्रामुख्याने अन्न प्रक्रिया उद्योग, लघु उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा या क्षेत्रातील उद्योगात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दर्शविले आहे. मुख्यमंत्री कुमार शेट्टी यांनी गुंतवणुकीसाठी उद्योजकांकडून प्रस्ताव मागविले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील कोणत्या क्षेत्रात चीन गुंतवणूक करू इच्छितो याची चाचपणी केली जात आहे. दरम्यान शुसन मा यांनी चीनमधून १० हजार विद्यार्थी आंध्रात विविध शैक्षणिक क्षेत्रात शिकण्यासाठी पाठविले जातील असेही सांगितले आहे.

चीनने इतक्या प्रचंड रकमेची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली असली तरी नक्की किती काळात ही गुंतवणूक केली जाणार आहे हे स्पष्ट केलेले नाही.

Leave a Comment