अमर्त्य सेन याना नरेंद्र मोदी नकोत

नवी दिल्ली – जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी नरेंद्र मोदी यांघ्या पंतप्रधानपदाला आपली पसंती नसल्याचं स्पष्ट केलं आहे मोदी यानी गुजरातच्या जनतेच्या आरोग्य आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं आहे असं मत सेन यांनी व्यक्त केलं.

गेल्या काही दिवसांपासून गुजरातच्या विकासाच्या मॉडेलचा गवगवा होत असला तरी प्रत्यक्षात गुजरातमध्ये ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये घरटी मासिकखर्च कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील गुजरातमधल्या जनतेची महिन्याकाठी खर्च करण्याची सरासरी देशात चौथ्या क्रमांकावर होती, ती आठव्या क्रमांकावर घसरली आहे. शहरी जनतेची सरासरी सातव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर घसरली आहे.

सध्या गुजरातमधल्या जनतेचं खर्च करण्याचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. इतकंच नाही, तर ते उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधल्या जनतेपेक्षाही कमी आहे. याचा अर्थ त्यांची अर्थव्यवस्था सुधारलेली नाही अशी काही माहिती सान्गुन सेन यानी मोदी याना विरोध आहे असे सान्गीताले.

Leave a Comment