अंडी कोलेस्टेरॉल मुक्त असल्याचा दावा

वॉशिंग्टन – अंडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढते. विशेषत: बालवयीन आणि पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये हा परिणाम प्रकर्षाने जाणवतो, असे मानले जात असले तरी अमेरिकेतल्या ग्रॅनाडा विद्यापीठातील संशोधकांनी हा समज चुकीचा असल्याचे दाखवून दिले आहे. अंडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढत नाही आणि हृदयविकाराला बळकटी मिळत नाही, असा दावा या संशोधकांनी पाहणीअंती केला आहे. मुलांनी दररोज दोन अंडी खाल्ली तर त्यांच्यात कोलेस्टेरॉल वाढत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

या संंशोधकांच्या या संशोधनाचे तपशील एका आरोग्य विषयक मासिकात प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी अंड्याचा दुष्परिणाम ङ्गेटाळून लावला असून अंड्याच्या नावावर खपवले जाणारे हे दुष्परिणाम प्रत्यक्षात मांसाहारामुळे होत असतात, असे दाखवून दिले आहे. त्यांनी अंडी आणि मांस खाणार्‍या अनेक मुलांची निरीक्षणे नोंदली असून त्यांच्या आधारे हा दावा केला आहे.

मुलांमध्ये आणि प्रौढ लोकांत सुद्धा बाजारातल्या तयार खाद्य वस्तूतील कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार बळावतो, अंड्यामुळे नाही. उलट अंडी हे सर्वात पौष्टिक आणि स्वस्त खाद्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशन या संघटनेने सुद्धा हे म्हणणे मान्य केले असून हृद्रोग्यांना आठवड्यातून तीनदा अंडी खाण्यास अनुमती दिलेली आहे. याकडे या संशोधकांनी लक्ष वेधले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment