सलमान-शाहरूख भेटले इफ्तार पार्टीत

मुंबई – गेल्या काही वर्षांपासून एकमेकांचे तोंडही न पाहणारे अभिनेता सलमान आणि शाहरुख खान या दोन बड्या स्टारनी आज एका इफ्तार पार्टीत एकमेकांची गळाभेट घेतली. हे दोघेही काँग्रेस आमदार बाबा सिद्दिकी यांनी आयोजित केलेल्या  इफ्तार पार्टीत एकत्र आले. 2008 पासून शाहरुख सलमानचे संबंध बिघडत गेले. त्यांनी एकमेकांशी बोलणंही टाळलं होतं. मात्र आज अखेर बाबा सिद्दिकींच्या इफ्तार पार्टीत या दोघांमधील दुश्मनी काहीशी निवळली. या पार्टीमध्ये शाहरुख खान हा सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यासोबत गप्पा मारतानाही दिसला. राजकीय नेते आणि फिल्मी कलाकारांसाठी बाबा सिद्दिकी यांनी वांद्रे इथल्या ताज लँड्समध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होते. या पार्टीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते.

फोटो व व्हिडीओ सौजन्य bollywoodhungama

Leave a Comment