टीम इंडिया झिम्बाब्वे दौ-यासाठी रवाना

मुंबई- झिम्बाब्वे दौ-यासाठी टीम इंडियाचा रविवारी पहाटे हरारेकडे रवाना झाला. या संघात अनुभवी क्रिकेटपटू नसले तरी आम्ही चांगली कामगिरी करू, असा विश्वास कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला. २४ जुलैपासून पाच वनडेंची मालिका सुरू होत आहे.

झिम्बाब्वे दौ-याला रवाना होण्यापूर्वी कर्णधार कोहली विमानतळावर पत्रकारांशी बोलताना म्हनाला, ‘ झिम्बाब्वे दौ-यासाठी निवडण्यात आलेले सर्वच्या सर्व म्हणजे १५ क्रिकेटपटू चांगले योगदान देतील यात शंका नाही. संघातील सर्व क्रिकेटपटू हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. चॅँपियन्स ट्रॉफी आणि विंडिजमधील तिरंगी मालिकेची जेतेपदे पाहता भारताची वनडेतील कामगिरी चांगली होत आहे. हे यश यापुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.’

‘टीम इंडियची जबाबदारी स्वीकारायला मला नेहमीच आवडते. कारण जेव्हा तुम्ही जबाबदारी घेता तेव्हा ते काम चांगले करता. जबाबदारी घ्यायला कुणीही घाबरू नये. स्वत:च्या क्षमतेवर तुमचा विश्वास असणे गरजेचे आहे. कर्णधार म्हणून संघातील क्रिकेटपटूंमध्येही आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे असते. ही जबाबदारी हाताळण्यासाठी मी सज्ज आहे,’ असे कोहली यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Comment