आदित्य ठाकरे लढविणार निवडणूक

नवी दिल्ली- ठाकरे घराण्याची नवी पिढी आगामी काळात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार झाली आहे. यापूर्वी ठाकरे घरण्यातील कुणीच प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले नाही. शिवसेनच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भविष्यात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

दिल्लीतील उद्योगपतींसमोर शिवसनेचे कार्याध्यधक्ष उद्धव ठाकरे यांनी हिंदीतून भाषण करून चांगली छाप पाडली, पण त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे देखील मागे राहिले नाहीत. या संमेलना मध्येच युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेही यांनी ही भाषण केले. युवकांच्या प्रश्नांवर पंतप्रधानांना सल्ला देण्यासाठी युथ कौन्सिल हवे, अशी मागणी करून त्यांनी आपली चमक दाखवली.

आगमी काळात युवकांचे प्रश्न हिरीरीनं मांडणारे आदित्य ठाकरे बोल्ड आणि बिनधास्त असल्याचा प्रत्ययच यानिमित्ताने सर्वांना आला. आजोबा बाळासाहेब ठाकरे तसेच वडील उद्धव ठाकरे हे जरी निवडणुकीत स्वतः कधी उतरले नसले, तरी आदित्य ठाकरे यांनी मात्र निवडणुकीला उभे राहाण्याचे संकेत दिले आहेत.

Leave a Comment