माध्यान्ह भोजनात कीटकनाशक

पाटणा – बिहारच्या सरन जिल्ह्यात गेल्या शनिवारी माध्यान्ह भोजनातून झालेल्या विषबाधेमुळे २३ मुले मरण्याच्या प्रकारातील अन्नात मोनोक्रोतोफोस हे कीटकनाशक मोठ्या प्रमाणावर मिसळले असल्याचे तपासणीअंती आढळून आले आहे. बिहारचे अतिरिक्त पोलीस संचालक रवींन्द्रकुमार यांनी ही माहिती दिली. फरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमधून अन्नाचे तपासून आल्यानंतर या तपासणीचे निष्कर्ष श्री. रवींन्द्रकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. या प्रयोगशाळेमध्ये या मुलांचे अन्न शिजविण्यासाठी वापरण्यात आलेल्या तेलाचे नमुने तपासण्यात आले, तेव्हा ही गोष्ट उघड झाली असल्याचे श्री. रवींन्द्रकुमार म्हणाले.

मोनोक्रोतोफोस अतिशय विषारी कीटकनाशक असून माणसासाठी ते ङ्गारच घातक समजली जाते. मात्र ते या तेलांमध्ये कसे मिसळले गेले याचा काहीच पत्ता लागलेला नाही. ज्या मुलांनी या तेलात तयार केलेली भाजी खाल्ली त्यांना विषबाधा झाली. मात्र ज्या मुलांनी काही कारणाने भाजी खाण्याचे टाळले पण दाळ खाल्ली त्यांना विषबाधा झाली नाही. त्यामुळे या तेलात काही तरी गडबड असावी असा संशय वाढला आणि शासकीय अधिकार्‍यांनी प्राधान्याने तेलाचे नमुने तपासले.

दरम्यान या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापिका अद्यापही ङ्गरारी आहे. हा प्रकार अन्नातून विषबाधा होण्याचा नाही तर अन्नात विष मिसळण्याचा आहे. अन्नातून विषबाधा होणे म्हणजे शिळे, आंबलेले अन्न खाणे. अशा अन्नामुळे विषबाधा होते. परंतु या प्रकारात तसे घडलेले नाही तर कोणी तरी या अन्नामध्येच मोनोक्रोतोफोस हे विषारी कीटकनाशक मिसळलेले आहे. अन्नातून विषबाधा झाल्यास तो निष्काळजीपणाचा प्रकार समजला जातो. परंतु जिथे अन्नातच विष मिसळले जाते तिथे तो कट समजला जातो.

दरम्यान उत्तर प्रदेशामध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. मुज्प्फ्र्नगर जिल्ह्याच्या लुसाना गावी माध्यान्ह भोजन केल्यानंतर ११ मुले आजारी पडली आहेत. या मुलांच्या जेवणामध्ये भात आणि कढी होती. त्या कढीतून विषबाधा झाली असावी, असा अंदाज आहे.

Leave a Comment