वॉशिंग्टन दि.१९ – पृथ्वीच्या पोटात असलेले आणि जगभर मौल्यवान धातू म्हणून ओळख असलेले सोने अब्जावधी वर्षांपूर्वी झालेल्या मृत तार्यांच्या टकरींमुळे निर्माण असल्याचे नवीन संशोधनात म्हटले गेले आहे. या संशोधकांच्या मते कार्बन अथवा लोह या तत्त्वांप्रमाणे सोने कुठल्याच तार्यांत निर्माण होणे अशक्य आहे. एखाद्या प्रलयंकारी भूकंपासारख्या घटनेतून निर्माण होत असलेल्या गॅमा किरणांमुळे मात्र ते तयार होणे शक्य आहे.
हावर्ड सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्स मधील संशोधक एड बर्जर यांच्या म्हणण्याप्रमाणे मागच्या कांही महिन्यात घडलेली घटना या दृष्टीने महत्वाची आहे. लघु गॅमा विस्फोट या नावाने ओळखल्रा जाणार्याे या घटनेत निर्माण झालेले लघु गॅमा किरण ही अत्याधुनिक उर्जास्फोटातून निघालेली अतिशय प्रकाशमान अशी चमक आहे. तार्यांतील दोन न्यूट्रान एकमेकांवर धडकल्याने ती निर्माण झाली असून हे न्यूट्राॅन तारे मृत तार्यांचाच एक भाग आहेत.
अशा प्रकारच्या टकरींमधून निर्माण होणारी लघु गॅमा चमक सोन्यासारख्या भारी धातूच्या उत्पत्तीत महत्वाची भूमिका बजावत असतात हे आता स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे दोन न्यूट्राॅन तारे धडकल्यानंतर निर्माण होणारे सोने आपल्या चंद्राच्या द्रव्यमानापेक्षा दहा पट अधिक इतके प्रचंड असते. ब्रह्मांडात जेथे म्हणून सोने असेल ते याच पद्धतीने झालेल्या विस्फोटातूनच निर्माण झाले असावे असाही दावा संशोधकांनी केला आहे.