नवी दिल्ली – रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत असल्यामुळे व्यापार उद्योग क्षेत्रात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असल्याचे सांगितले जाते. परंतु भारतातून परदेशात जाऊन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना सुद्धा या रुपयाच्या घसरणीमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे याची ङ्गारशी चर्चा होत नाही. प्रत्यक्षात मात्र या विद्यार्थ्यांचे परदेशातले खर्च १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. परदेशी जाताना त्यांनी जेवढे शैक्षणिक कर्ज काढले होते त्या कर्जाच्या रुपयातल्या रकमेची किंमत वर्षभरात प्रत्यक्ष होणार्या खर्चाच्या ७० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
परदेशी शिक्षणासाठी नवी शिष्यवृत्ती
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अशा शिष्यवृत्तीची गरज आहे की, जी शिष्यवृत्ती रुपयाची किंमत कितीही घसरली तरीही परदेशी जाणार्या विद्यार्थ्यांचा होणारा पूर्ण खर्च देऊ शकेल, अशी एक शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांसाठी ब्रिटनमध्ये उपलब्ध आहे. हॉर्नबी स्कॉलरशीपस् असे या शिष्यवृत्तीचे नाव असून ती मिळणार्या विद्यार्थ्यांचे पूर्ण खर्च तिच्यातून केले जातात.
आयईएलटीएस परीक्षा ६.५ गुण घेऊन उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. ही शिष्यवृत्ती इंग्रजी भाषेचा अभ्यास करणार्यांसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी http://www.britishcouncil.org वर संपर्क साधावा.