लंडन – अशेस मालिकेतील दुस-या कसोटीत इंग्लंडने धावांचा डोंगर उभा केला आहे. सलामीवीर रूटच्या शानदार शतकाच्या मदतीने इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुस-या डावात तिस-या दिवसअखेर ५ बाद ३३३ धावा केल्या आहेत. रूटशिवाय इयान बेलने अर्धशतक ठोकत या सामन्यात वचर्स्व प्रास्थापित केले आहे. इंग्लंडने
तब्बल ५६६ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. या सामन्यातही इंग्लंड विजयाच्या उंबरठयावर आहे.
या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३६१ धावा काढल्यानंतर ऑस्ट्रेलियाला १२८ धावांत गुंडाळले. इंग्लंडने पहिल्या डावात २३३ धावांची आघाडी घेतली. दुस-या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार अलेस्टर कुक (८), जोनाथन ट्रॉट (०) आणि केविन पीटरसन (५) हे महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. इंग्लंडचा डाव कोलमाडतो, असे वाटत असताना रूट मदतीला धावून आला.
सलामीला आलेल्या रूटने नाइट वॉचमन टीम ब्रेसननसोबत चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करून सामन्याचे चित्र बदलवले. इयान बेलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. रूटने १२ चौकारांसह १०५ धावा केल्या इयान बेलसोबत त्याने १५३ धावांची भागीदारी केली. अजन सामन्यासचे दोन दिवस शिल्लसक आहेत. इंग्लंडने
तब्बल ५६६ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुस-या कसोटी सामन्यात इंग्लंडचे पारडे जड वाटत आहे.