विधान परिषद निवडणुकीसाठी आकडेमोड सुरू

औरंगाबाद– औरंगाबाद-जालना स्थानिक स्वेराज्यग संस्थेच्या निवडणूकीसाठी शिवसेना व कॉग्रेसने आकडेमोड सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसकडून औरंगाबाद – जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ खेचून घेतला होता.

गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे १४० मतदार होते. गेल्याल निवडणूकीत भाजपने शिवसेनेऐवजी अपक्ष उमेदवार सुभाष झांबड यांना पाठिंबा दिला होता शिवसेनेचे किशनचंद तनवाणी यांनी मोठ्या कौशल्याने विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेची मोठी पिछेहाट झाली आहे. मतदानाचा हक्क असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात ६९ व जालना जिल्ह्यात २३ शिवसेना सदस्य निवडून आले आहेत.

या ९२ मतदारांच्या जोरावर शिवसेनेला ही निवडणूक लढवावी लागणार आहे.
शिवसेनेचे सदस्य कमी झाल्यामुळे विद्यमान आमदार किशनचंद तनवाणी यांनी औरंगाबाद मध्य मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. दुसरे कोणीच इच्छूक नसल्याने आमदार तनवाणींना ही निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दोन महिन्यापुर्वी निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे जालना येथील कॉग्रेस कार्यकत्यानला उमेदवारी देण्यालत यावी यासाठी कॉग्रेस कार्यकनी मुंबई दरबारी हजेरी लावली आहे.

Leave a Comment