नवी दिल्ली- आगमी काळात देशाला विश्वासू नेतृत्वाची गरज आहे. सध्या तरी रालोआत असा विश्वासू चेहरा दिसत नाही. त्यारमुळे आता एक बळकट सरकार निवडण्यावरच लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्या पंतप्रधानपदाबाबत अनिश्चतेचे संकेत दिले आहेत. दिल्लीज येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रालोआच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हयणाले, ‘आमच्याकडे रालोआत अनेक विश्वासार्ह चेहरे आहेत. थोडा धीर धरा. तुम्हाला लवकरच कळेल.’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी असलेल्या जवळिकीतमुळे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापासून शिवसेना बरीचसी लांब आहे. गेल्या काही दिवसांपासून या पार्श्वभूमीवर मोदी यांची होत असलेली जाहिरातबाजी शिवसेनेला आवडलेली नाही. उत्तराखंडमध्ये मोदींनी केलेल्या मदतकार्यावरूनही शिवसेनेने त्यांच्या वर टीका केली होती. त्यामुळे आगामी काळात शिवसेना मोदीच्या पंतप्रधानपदाला पाथिबा दर्शविणार की नाही यावरून सवाल उपस्थित झाला आहे.