मेहंदी लगा के रखना…

नवी दिल्ली : पूर्वीच्या काळी नागपंचमीला हातावर मेंदी रंगवण्याची पध्दत होती. पण पुढे सर्वच सणांना आणि घरातल्या मंगल कार्यक्रमांना मेंदी काढण्याची प्रथा रुढ झाली आहे. सर्वसाधारणपणे मेंदीकडे सौंदर्य प्रसाधन म्हणून पाहिले जाते आणि तसा तिचा आणखी एक वापर आता सुरू झाला आहे तो म्हणजे केस रंगवणे. पांढरे केस असणारे लोक मेंदी लावून केस लाल करतात आणि केसांचा पांढरेपणा लपवण्याचा प्रयत्न करतात. परंतु मेंदी हे केवळ सौंदर्यप्रसाधन नसून ते औषधसुध्दा आहे आणि आयुर्वेदाने त्याचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहेत.

केसाला मेंदी लावली तर केसांचा केवळ रंगच बदलतो असे नाही तर केसांना इतरही अनेक फायदे होतात. मेंदी हे उत्तम हेअर कंडीशनर आहे. असे आता आढळून आलेले आहे. केसांच्या आरोग्यात त्यांच्यातील अल्कली आणि ऍसिड यांच्या संतुलनाला फांर महत्त्व आहे. हे संतुलन नीट राखले गेले तर केस लवकर पिकतही नाहीत आणि गळतही नाहीत. मेंदीमुळे हे संतुलन राखले जाते असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे.

मेंदीने बुरशींचा नाश होतो आणि काही जंतूंचाही नाश होतो. त्यामुळे तिला अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल म्हटले जाते. तिच्या या गुणधर्मामुळे केस केवळ रंगवलेच जातात असे नाही तर ते दाट होतात आणि चमकायला लागतात. डोक्याला दाट मेंदी लावली तर मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासही उपयोग होतो आणि क्षयरोगाला सुध्दा उपाय होतो असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे.

Leave a Comment