पाणी पिणार्‍याची बुध्दी पाणीदार

waterवॉशिंग्टन : पाणी प्याल्यामुळे बुध्दी तेज होते आणि कोणत्याही माहितीचे आकलन पटकन होते असे इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या एका प्रयोगात आढळले आहे. ईस्ट लंडन स्कूल ऑफ सायकॉलॉजी या संस्थेमध्ये पाणी आणि आकलन शक्ती यांच्या संबंधावर काही प्रयोग करण्यात आले तेव्हा असे आढळले की माणूस पाणी पिऊन एखादे वाचन करतो तेव्हा त्याला वाचलेल्या मजकुराचे आकलन चांगले होते.

याउलट एखाद्या व्यक्तीला भरपूर तहान लागलेली असताना सुध्दा प्यायला पाणी न देता वाचन करायला लावले तर किंवा एखादे काम करायला लावले तर ती व्यक्ती पाणी पिलेल्या व्यक्तीपेक्षा मंदपणे आकलन करते. या दृष्टीने या संस्थेने या लोकांवर प्रयोग केले आणि तहानलेल्या अवस्थेत त्यांना काही अवघड कामे सांगितली. तेव्हा त्यांना ती कामे व्यवस्थित समजली नाहीत. उलट भरपूर पाणी प्यायलेल्या लोकांना हीच कामे सांगितली तेव्हा त्यांना ती कामे १४ टक्के जास्त वेगाने समजली.

या मागचे कारणे काय असावीत याचा छडा लावण्यात आला. तेव्हा असे आढळले की कोणत्याही गोष्टीचे आकलन होण्यासाठी आपल्या शरीरातील व्हॅसोप्रेसिन हे हार्मोन कार्यरत व्हावे लागते. कमी पाणी प्यायलेल्या अवस्थेत हे हार्मोन कार्यरत होत नाहीत आणि भरपूर पाणी प्यायल्यास ते कार्यरत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment