राज्यात भरपूर पाऊस पडू दे – मुख्यमंत्री

पंढरपूर – पंढरपूरात दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी राज्यांत भरपूर पाऊस पडू दे आणि राज्यातील दुष्काळ सरु दे अशीच मागणी आपण विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासोबत गेल्या पंचवीस वर्षांपासून अधिक काळ नियमित वारी करणा-या जालना जिल्ह्यातील जाफराबादचे नामदेव वैद्य आणि गंगूबाई वैद्य दांपत्य मानाचे वारकरी ठरले. यांच्या हस्ते शुक्रवारी पहाटे विठ़ठल–रुक्मीणीची विधीवत्त पूजा करण्यात आली. यावेळी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. पंढरपूरात आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी दहा लाखंपेक्षा अधिक भविकांनी गर्दी केली आहे.

‘भरपूर पाऊस पडू दे आणि राज्यातील दुष्काळ सरु दे’ अशीच मागणी आपण विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठूरायाच्या दर्शनानंतर पत्रकांराशी बोलताना सांगितले. गुरूवारी मुख्यामंत्री चव्हांण हे पंढरपूर मुक्कमी होते. आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी दहा लाखंपेक्षा अधिक भाविक आल्याने याठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment